ऐलतीर आणि पैलतीर
शब्द भासती फार गंभीर
चार अक्षरांची मजा असते
जीवनात त्यांची उणीव नसते
ऐलतीरावर सुटते बालपणाची साथ
पैलतीरावर लाभतो तारुण्याचा हात
दोन्ही तीर फारसे दूर नसतात
मनाच्या वळणात मात्र दूर भासतात
ऐलतीर - पैलतीर जोडतो एक पूल
अंतराच्या हिशोबात द्यावी -घ्यावी चूकभूल
- विनया पराडकर
No comments:
Post a Comment