आजी
फार वर्षांपूर्वीची आठवण झाली ताजी
कुण्या गोड क्षणी माझी आई झाली आजी
असे म्हणतात बाळाचे दिसतात पाळण्यात पाय
तरीही ती कायम असते दुधावरची साय
क्षणोक्षणी बाळ वाढते होते ते लबाड
क्षणोक्षणी मात्र आजी करते त्याचे लाड
बाळ वाढे नित्य दिनी वाढे पसारा
तरी बाळ असते तिच्या मनाचा निवारा
आजी खुश बाळासाठी चेहेऱ्यावर कायम हसू
वचन माझे आजी तुला -
बाळाच्या चेहेऱ्यावर असेल कायम हसू
दारामागे दडून नको कधी पुसू डोळ्यातले आसू
- विनया पराडकर
No comments:
Post a Comment