Friday, January 28, 2011

Think about it...



ऐलतीर  आणि पैलतीर
शब्द भासती फार गंभीर
चार अक्षरांची मजा असते
जीवनात त्यांची उणीव नसते

ऐलतीरावर सुटते बालपणाची साथ
पैलतीरावर लाभतो तारुण्याचा हात
दोन्ही तीर फारसे दूर नसतात
मनाच्या वळणात मात्र दूर भासतात
ऐलतीर - पैलतीर जोडतो एक पूल
अंतराच्या हिशोबात द्यावी -घ्यावी  चूकभूल

- विनया पराडकर

Thursday, January 27, 2011

Something New..


असे म्हणतात की सर्व विषयांवर कविता लिहिल्या जातात पण का कुणास ठाऊक आपल्या वडिलांबद्दल खूप कमी लिहिल्या जातात. सहज आठवणी आल्या म्हणून ......



एक होते बाबा त्यांना म्हणत आबा
माणूस खरा साधा  प्रेमाच्या फुलवी बागा
पिता होता मजेदार आणि प्रेमळ
नजरेत  सर्वांसाठीची तळमळ
प्रसन्न चित्त शांत हसरा
असा माझा पिता होता खरा
एक दिवस देवाजीला आली लहर
त्याच्या प्रेमाचा झाला कहर
विश्वनाथासाठी नाही थांबला प्रहर
करून घेतले दरबारी हजर
दरबारातही फुलवले असेल हसू
आमच्या नयनात मात्र उगाच आसू.....


- विनया

Tuesday, January 25, 2011

Aaj26th January, sarvanna subhecha,


Bharat Mahan Bharat
Nitya tyaala smarat
Sukhad athavani sathavat
Smita hasya japat
Avahane swikaru hasat
Satat rahuya karyarat
Theau samruddhicha nandadip tevat

Friday, January 21, 2011

Marathi poems 1 and 2



Intro

Hello people,


Mind is very much comparable to an infinite ocean of creativity. Thus, just thought to share some poems, some random thoughts with you all. Please give me your feedback. Thank you.


Vinaya